wardha saam tv
महाराष्ट्र

Wardha: समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरण; प्रवाशांच्या नातेवाईक न्यायाच्या प्रतिक्षेत, बेमुदत उपाेषणाचा सहावा दिवस

आंदोलन दरम्यान मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना अश्रुंना वाटा मोकळ्या करुन दिल्या.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg) बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स अपघातात २० परिवारातील २५ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही न्याय मिळालेला नाही. या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी गेल्या सहा दिवसांपासून कुटुंबियांच्या नातेवाईकांनी बेमुदत उपाेषण सुरु केले आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांसह युवकांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यानी अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृताच्या परिवाराला २५ लाखांच्या मदतीची घोषणाही केली होती. परंतु मृतांच्या परिवाराला राज्य शासनाकडून केवळ ५ लाखांची मदत मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उर्वरित मदतीबाबत प्रशासकीय यंत्रणांसह सरकारने मौन पाळले आहे. लोकसभा आणि विधानसभेत अपघाताचा मुद्दा उपस्थित होऊनही मृताच्या परिवाराच्या मागणीची दखल घेतली नसल्याने परिवाराने 8 डिसेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान दररोज एक परिवार उपोषणाला बसत आहे. या उपोषणात पुणे, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम व वर्धा जिल्ह्यातील परिवार सहभागी झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

SCROLL FOR NEXT