मधमाशांशी मैत्री करत युवक कमविताहेत लाखो रुपये, वाचा कानवडे बंधूंची Success Story

honey bee keeping project : मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार अनुदान देते.
raju kanawade
raju kanawadesaam tv

- सचिन बनसोडे

Nagar News : मधमाशी पालन म्हणजे फक्त मधासाठीच हा विचार न करता परागीभवनाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवता येते हे अहमदनगर जिल्ह्यातील राजू कानवडे (raju kanawade) आणि संदेश कानवडे (Sandesh Kanawade) या बंधूंनी दाखवून दिले. कानवडे बंधूंनी नोकरीच्या मागे न लागता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर गेल्या चौदा वर्षात मधमाशी पालनाच्या व्यवसायात यश मिळवले आहे. मधमाशी पालनातून कानवडे बंधू वर्षाकाठी ४० लाख रुपयांची उलाढाल करतात. (Maharashtra News)

raju kanawade
Mahabaleshwar : प्रशासन आजही ठाम; महाबळेश्वरातील अवैध बांधकामाच्या कारवाईवर स्थानिकांचा प्रशासनावर आराेप

अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे शेती करणे जिकरीचे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या सर्व संकटांवर मात करीत अकाेले तालुक्यातील राजू कानवडे आणि संदेश कानवडे या बंधूंनी मधमाशी (bee) पालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे सोळाशे पेट्या असून त्यात लाखो मधमाशा आहेत.

या मधमाशांचा उपयोग फक्त मधासाठीच नव्हे तर परागीभवनाच्या माध्यमातून भाज्या, विविध फळ पिके, कांदा, लसूण इत्यादींचे उत्पादन वाढवण्यासाठी होतो. शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने कानवडे बंधूंच्या मधमाशांना देशभरातून मोठी मागणी आहे. या पेट्या भाडे तत्वावर देऊन कानवडे बंधू वर्षाकाठी जवळपास ४० लाख रुपयांची उलाढाल करतात.

अस्सल मधासह कानवडे बंधू मधापासून विविध सौंदर्य प्रसाधने, मेनापासून बनवलेले दिवे आणि विविध उत्पादनांची निर्मिती करून ते होलसेल दरात विक्री करतात. मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या खादी ग्रामउद्योग तसेच कृषी विभागाकडून अनुदान मिळते अशी माहिती देखील कानवडे बंधूंनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डंक मारणारी माशी म्हणून मधमाशांपासून सर्वजण सुरक्षित अंतर ठेवून रहातात. मात्र याच मधमाशांशी मैत्री करत अहमदनगर जिल्ह्यातील कानवडे बंधूंनी आर्थिक प्रगती साधली आहे. गो पालन, कुक्कुट पालन, शेळी पालन यासह मधमाशी पालनाला प्राधान्य दिले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल एवढे मात्र नक्की.

Edited By : Siddharth Latkar

raju kanawade
Rasta Roko Andolan : आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतक-यांनी अहमदनगर संभाजीनगर महामार्ग राेखला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com