Satara News : महाबळेश्वरताली अवैध बांधकामांवर अखेर प्रशासनाने हातोडा मारला. या धडक कारवाईमुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर काहींनी कारवाईस विराेध दर्शविला. या विराेधास न जुमानता प्रशासन कारवाईवर ठाम राहिले. दरम्यान उर्वरीत अवैध बांधकमांवर लवकरच कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी याेगेश पाटील (chief officer yogesh patil) यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणुन ओळख असणाऱ्या आणि निसर्गाचं भरभरुन वरदान लाभलेल्या महाबळेश्वरला गेल्या अनेक वर्षांपासून अवैध बांधकामांचे ग्रहण लागले आहे. अखेर या बांधकामांवर आता प्रशासनाने हातोडा चालवला आहे.
सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी (ias jitendra dudi marathi news) यांनी चालु असलेल्या अवैध बांधकामावर कारवाईचे आदेश महाबळेश्वर नगरपालिकेला दिले होते. या आदेशाचं पालन करत महाबळेश्वर नगरपालिकेने काही बांधकामं जमिनदोस्त केली.
येथे अनेक धनीकांनी वेण्णा नदीच्या पात्रात सुद्धा ही बांधकामं केली आहे. त्याच्या विरोधात महाबळेश्वर नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत दोन बांधकामे पाडली. उरलेल्या बांधकामांना १५ दिवसांची मुदत देवुन स्वत:च ही बांधकामे काढावीत असे लेखी या व्यावसायिकांकडून लिहुन घेण्यात आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यामुळं आता महाबळेश्वरातील अवैध बांधकाम करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान या कारवाईबाबत प्रशासन आमच्यावर अन्याय करत असल्याचा आराेप काही शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.