- सचिन बनसाेडे
Nagar News : नगर जिल्ह्यातील मुळा धरणात जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यात येऊ नका अशी भूमिका घेत आज (गुरुवार) आमदार शंकरराव गडाख (mla shankarrao gadakh) यांनी आंदाेलन छेडले आहे. या आंदोलकांनी अहमदनगर संभाजीनगर महामार्ग (rasta roko at ahmednagar sambhajinagar highway) राेखला आहे. (Maharashtra News)
नगर जिल्ह्यातील मुळा धरण समूहातून २०१० टीएमसी आणि प्रवरा धरण समूहातून ३०३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास नगर जिल्ह्यातून तीव्र विराेध हाेऊ लागला आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण हाेऊ शकते अशी भिती व्यक्त हाेऊ लागली आहे. त्यातूनच शेतकरी देखील पाणी साेडण्यास विराेध करीत आहेत.
या निर्णाया विराेधात आज नेवासा तालुक्यात रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले हाेते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नगर नाशिकमधील पाणी सोडण्याच्या आदेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुळा धरणातून पाणी सोडण्याला आमचा विरोध असल्याचे आंदाेलकांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले. जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास आम्हांला आगामी काळात पाणी टंचाईला सामाेरे जावे लागेल असेही शेतक-यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.