Maharashtra Talathi Recruitment Fraud Saam Tv
महाराष्ट्र

Talathi Recruitment Scam: राज्यात बोगस तलाठी भरतीचं रॅकेट, 15 लाखांत नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण

Maharashtra Talathi Recruitment Fraud: राज्यामध्ये बोगस तलाठी भरतीचे रॅकेट उघड झाले आहे. १५ लाखांमध्ये नियुक्तीपत्र दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • राज्यात बोगस तलाठी भरती रॅकेटचा पर्दाफाश

  • १५ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचा आरोप

  • उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट प्रशिक्षण आणि लॅपटॉप देण्यात आले

  • जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या चौकशीच्या फोनमुळे हा प्रकार उघडकीस

बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न असताना तरुणांना सरकारी नोकरीचं आमीष दाखवून फसवणूक केली जातेय. राज्यात बोगस तलाठी भरतीचं रॅकेट उघड झालंय. हा प्रकार कसा उघडकीस आला? बेरोजगारांची कशी फसवणूक झाली? पाहूया एक खास रिपोर्ट...

महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांनी तरुणाई त्रस्त असतानाच दुसरीकडे बोगस भरतीद्वारे तरुणांची फसवणूक होतेय. राज्यात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. 15 लाख द्या आणि तलाठी व्हा' असं आमिष दाखवणारं बोगस भरतीचं रॅकेट उघडकीस आलंय. तरुणांना गंडा घालण्यासाठी कशी मोडस ऑपरेंडी वापरली गेली ते पाहूयात..

कशी झाली बेरोजगारांची फसवणूक?

संभाजीनगरात 15 लाखांत तलाठी पदाच्या बनावट नियुक्तीपत्राचं वाटप

विश्वास संपादन करण्यासाठी टोळीकडून उमेदवारांना लॅपटॉप आणि बोगस प्रशिक्षण

नियुक्तीपत्रांवर जिल्हा प्रशासकीय प्रमुखांच्या खोट्या सह्या आणि बनावट शिक्के

जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका चौकशीच्या फोनमुळे रॅकेटचा पर्दाफाश

2023ची अधिकृत भरती प्रक्रिया पूर्ण, भूलथापांना बळी न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन

या प्रकारानंतर एका सजग तरुणानं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी फोन केला आणि या रॅकेटचं बिंग फुटलं. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासनानं 2023ची अधिकृत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलंय. 153 पैकी 144 जणांना नियुक्ती देण्यात आली आहेत. नागरिकांना कुठल्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

या प्रकरणी प्रशासनाकडे अद्याप अधिकृत तक्रार आलेली नाही. मात्र वरीष्ठ महसूल अधिकाऱ्यांना पोलिसांनी माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच तलाठी भरती 'MPSC'मार्फत राबवली जाण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 1700 तलाठी पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे. अशी स्थिती असतानाच बेरोजगार तरुणांच्या निराशेचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जातेय.

मात्र तलाठी पदासाठी बोगस नियुक्तीपत्र देऊन प्रशिक्षणही दिलं जात असताना जिल्हा प्रशासनाला या प्रकाराची खबर लागू नये हे धक्कादायक आहे. संभाजीनगरसह राज्यात आत्तापर्यंत किती तरुणांची फसवणूक झाली आहे.? या रॅकेट मागे कोण सुत्रधार आहे? त्याच्यावर कधी आणि कशी कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT