Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

Shruti Vilas Kadam

बॉर्डर (1997)

भारतीय जवानांच्या शौर्याची आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची कथा दाखवणारा लोकप्रिय बॉर्डर हा चित्रपट आहे. लोंगेवालामध्ये झालेल्या 1971 मधील युद्ध या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, पूजा भट्ट यांची दमदार कास्ट आहे.

Border (1997)

उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019)

भारतीय लष्कराच्या धाडसी सर्जिकल स्ट्राइकची थरारक कहाणी उरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी आदि कलाकारांचा दमदार अभिनय पहायला मिळतो.

Patriotic Movies | Saam Tv

शेरशाह (2021)

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची आणि कारगिल युद्धातील बलिदानाची भावनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शिव पंडित, निकितिन धीर हे या चित्रपटात आहेत.

Patriotic Movies | Saam Tv

केसरी (2019)

सारागढीच्या ऐतिहासिक लढाईत भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची कहाणी आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परिणीती चोप्रा, मीर सरवर, वंश भारद्वाज आदी कलाकार आहेत.

केसरी (2019)

स्वदेस (2004)

देशसेवा केवळ सीमेवरच नाही, तर आपल्या समाजासाठी काम करण्यातही आहे, असा सुंदर संदेश देणारा चित्रपट. या चित्रपटात शाहरुख खान, गायत्री जोशी, किशोरी बल्लाळ, राजेश विवेक या कलाकारांनी काम केले आहे.

Patriotic Movies | Saam Tv

लक्ष्य (2004)

भारतीय लष्करात दाखल झालेल्या तरुणाच्या प्रवासातून देशासाठी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा चित्रपट. या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी, बोमन इराणी सारखे कलाकार आहेत.

लक्ष्य (2004)

चक दे! इंडिया (2007)

भारतीय महिला हॉकी संघाच्या संघर्षाची आणि देशासाठी विजय मिळवण्याच्या जिद्दीची प्रेरणादायी कथा. या चित्रपटात शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे, शिल्पा शुक्ला, चित्राशी रावत यांसारखे कलाकरांनी काम केले आहे.

Patriotic Movies | Saam Tv

Gobi Manchurian Recipe: हॉटेलसारखा कुरकुरीत गोबी मंचुरियन घरच्या घरी बनवा; वाचा सोपी आणि झटपट रेसिपी

Gobi Manchurian Recipe
येथे क्लिक करा