Gobi Manchurian Recipe: हॉटेलसारखा कुरकुरीत गोबी मंचुरियन घरच्या घरी बनवा; वाचा सोपी आणि झटपट रेसिपी

Shruti Vilas Kadam

कोबीचे तुकडे करा

सर्वप्रथम फुलकोबी स्वच्छ धुऊन मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. गरम पाण्यात थोडे मीठ घालून फुलकोबी काही मिनिटे ठेवली तर ती स्वच्छ होण्यास मदत होते.

Rice Manchurian Recipe

मंचुरियनसाठी बॅटर तयार करा

एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट आणि थोडी मिरीपूड घ्या. त्यात पाणी घालून मध्यम घट्टसर बॅटर तयार करा.

Rice Manchurian Recipe

कोबी बॅटरमध्ये मिक्स करा

तयार बॅटरमध्ये फुलकोबीचे तुकडे घाला आणि प्रत्येक तुकड्याला बॅटर व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या.

Rice Manchurian Recipe

कोबी कुरकुरीत तळा

कढईत तेल गरम करून त्यात बॅटरमध्ये घोळवलेले फुलकोबीचे तुकडे सोडा. ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.

Rice Manchurian Recipe

मंचुरियन सॉस तयार करा

दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, आले, कांदा आणि शिमला मिरची परता. त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडे व्हिनेगर घाला.

Manchurian Recipe | Yandex

कुरकुरीत गोबी सॉसमध्ये मिक्स करा

तयार सॉसमध्ये तळलेले गोबीचे तुकडे घाला आणि मोठ्या आचेवर काही मिनिटे झटपट परता. सर्व तुकड्यांना सॉस व्यवस्थित लागला की गॅस बंद करा.

Manchurian Recipe | Yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार गोबी मंचुरियनवर बारीक चिरलेली स्प्रिंग ओनियन किंवा कोथिंबीर घाला. कुरकुरीत चव टिकवण्यासाठी ते लगेच गरमागरम सर्व्ह करा.

Manchurian Recipe

Fancy Suit Designs: रक्षाबंधनाला काय घालावं सुचत नाहीये? ट्राय करा हे ५ ट्रेन्डी फॅन्सी सूट डिझाईन्स

Fancy Suit Designs
येथे क्लिक करा