Nandurbar  Saam tv
महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

nandurbar news : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आलीये. दगडफेक करून आरोपी तस्कर फरार झालीये.

Vishal Gangurde

धडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

निगदी फाटा परिसरात आरोपींनी पथकावर केली दगडफेक

जप्त केलेल्या 19 लाखांचा अवैद्य दारू साठ्यासह चार चाकी वाहन घेऊन तस्कर फरार

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडलीये. निगदी फाटा परिसरात आरोपींनी पथकावर दगडफेक करत जप्त केलेली दारू आणि वाहन बळजबरीने पळवून नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या पथकाने निगदी शिवारात छापा टाकला. पथकाने 19 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये विदेशी दारूचे 200 बॉक्स आणि एका पिकअप वाहनाचा समावेश होता. मात्र, कारवाई सुरू असतानाच बुधा झांगडे आणि सुरेश झांगडे यांच्यासह 10 ते 12 जणांच्या जमावाने पथकाला घेरले.

वाहन पुढे नेल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी जोरदार दगडफेक केली. जप्त केलेला मुद्देमाल बळजबरीने लुटून नेला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धडगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पंढरपुरात नातवाकडून आजोबा आणि आत्याला मारहाण

पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे नातवाकडून आजोबाला आणि आत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतीच्या कारणावरून भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. करण भालचंद्र केकाण, मयूर विशाल केकाण,विशाल महादेव केकाण आणि एक जण अनोळखी अशा चार जणांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत उद्घाटनाआधीच 210 कोटींच्या पुलावर खड्डा; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

Glowing Skin Tips: किचनमध्येच लपलंय आपल्या सौंदर्याचं गुपित; हा एक पदार्थ लावा, चेहरा चमकेल पाऱ्यासारखा

SCROLL FOR NEXT