Shreya Maskar
लोणावळ्याजवळ ऐतिहासिक विसापूर किल्ला आहे. विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील १८ व्या शतकातील एक मराठा दुर्ग आहे.
पावसाळ्यातील ट्रेकसाठी विसापूर किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्यावर भव्य तटबंदी, प्राचीन गुंफा आणि भगवान हनुमानाचे एक विशाल कोरीव शिल्प पाहायला मिळते.
विसापूर किल्ल्यावरील प्रमुख आकर्षणामध्ये प्राचीन गुंफा, खडकात कोरलेली पाण्याची टाकी, दगडाची पीठाची गिरणी यांचा समावेश आहे. तसेच येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
विसापूर किल्ल्याजवळ लोहगड किल्ला, भाजे लेणी, पवना तलाव, कुणे धबधबा, एकविरा देवी मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत.
विसापूर किल्ला लोहगड-विसापूर या दुहेरी दुर्ग-संकुलाचा एक भाग म्हणून ओळखला जातो. तुम्ही येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भेट देऊ शकता.
विसापूर किल्ल्याजवळ मळवली रेल्वे स्टेशन आहे. मळवली स्थानक किल्ल्यापासून अवघ्या ५-६ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचू शकता.
१७१३ ते १७२० या काळात बाळाजी विश्वनाथ (मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे) यांनी बांधलेला हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी आणि आपला शेजारी असलेल्या लोहगडाला संरक्षण देण्यासाठी उभारण्यात आला होता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.