Shreya Maskar
सामानगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात, गडहिंग्लज शहरापासून आग्नेयेस अवघ्या १० ते ११ किमी अंतरावर वसलेला आहे. येथे तुम्ही सुट्ट्यांमध्ये भेट द्या.
सामानगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,९७० फूट उंचीवर आहे. येथे गेल्यावर दगडी पाण्याची टाकी, तटबंदी आणि मंदिरे पाहायला मिळतात.
सामानगड किल्ला १२ व्या शतकात शिलाहार राजा भोज (दुसरा) यांनी बांधला. इ.स. १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.
सामानगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात लहान, तरीही सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
१६७६ मध्ये सुभेदार अण्णाजी दत्तो यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची पुनर्बांधणी व दुरुस्ती केली. लहान आकार असूनही त्याची अभेद्य रचना त्याला खास बनवते.
युद्धात आजाराने मरण पावलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख येथे पाहायला मिळतात. सामानगड किल्ला एका अंडाकृती डोंगरावर वसलेला आहे. गडावरून परिसरातील विहंगम दृश्ये अतिशय नयनरम्य दिसतात.
अंबाबाई मंदिर, पन्हाळा किल्ला, रंकाळा तलाव, गगनबावडा , आंबा घाट ही कोल्हापूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.