Fort In Palghar : पालघरमधील ऐतिहासिक आकर्षण, सागरी सुरक्षेचा रक्षक म्हणून ओळखला जायचा 'हा' किल्ला

Shreya Maskar

पालघर

डहाणू किल्ला (Dahanu Fort) हे १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला एक जलदुर्ग आहे. तुम्ही येथे वीकेंड प्लान करू शकता.

Palghar | google

कोणी बांधला?

पोर्तुगीजांनी १५३३-१५३४ च्या सुमारास डहाणू खाडीच्या उत्तर तटावर डहाणू किल्ला बांधला.

Who Built It? | google

सद्यस्थिती

ऐतिहासिक डहाणू किल्ल्यामध्ये तहसीलदार कार्यालय आणि कारागृह कार्यरत आहे. पर्यटकांना केवळ किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीपर्यंत आणि प्रवेशद्वारावरील दोन तोफांपर्यंतच प्रवेश मिळतो.

Current Status | google

कसं जायचे

डहाणू स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने डहाणू किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल. डहाणू किल्ला डहाणू समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. गढीला चार भक्कम बुरुज आणि दोन प्रवेशद्वारे आहेत.

How to Get There | google

सागरी मार्गांचे रक्षण

सागरी मार्गांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. पुढे १७३९ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.

Guardian of Maritime Routes | google

डहाणू बीच

डहाणू समुद्रकिनारा हा आपल्या विस्तीर्ण , शांत किनारपट्टीसाठी, सभोवतालच्या चिकूच्या बागांसाठी आणि गर्दीविरहित व शांत वातावरणासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

Dahanu Beach | google

डहाणू पर्यटन स्थळे

डहाणूजवळ बोर्डी बीच, चिखला बीच , मंदिरे येथे पाहायला मिळतात. तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट करू शकता.

Bordi Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : मुंबईत राहूनही तुम्ही कधीच पाहिले नसाल 'हे' ५ सीक्रेट पिकनिक स्पॉट्स, उन्हाळी सुट्टी करा एन्जॉय

Mumbai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...