Shreya Maskar
बाणगंगा तलाव हा ९०० वर्षे जुना पवित्र तलाव आहे. आख्यायिकेनुसार, प्रभू रामाच्या बाणामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह उफाळून आला होता.
गिल्बर्ट हिल ज्वालामुखीच्या खडकांपासून बनलेला एक स्तंभ आहे. पृथ्वीवरील अशा प्रकारच्या तीन नैसर्गिक रचनांपैकी ही एक आहे. हे ठिकाण अंधेरीमध्ये स्थित आहे.
माहीम नेचर पार्क १९७७ साली हे ठिकाण कचरा डेपो होते. आज मात्र येथे १८,००० झाडे, विविध प्रकारचे फुलपाखरे आणि पक्षी पाहायला मिळतात. हे मुंबईचे एक चमत्कारिक जंगलच म्हणावे लागेल.
छोटा काश्मीर हे गोरेगाव पूर्व येथे आहे. एकेकाळी बॉलिवूडसाठी 'काश्मीर'चे पर्यायी ठिकाण म्हणून वापरले जात असे. येथे एक सुंदर तलाव आहे. जेथे बोटिंगचा आनंद घेता येतो.
मुंबईतील २०० वर्षे जुनी खोताची वाडी आहे. येथे गोव्याच्या शैलीतील घरे (Cottages) पाहायला मिळतात. येथे खूपच शांत वातावरण आहे.
जोगेश्वरी लेणीमध्ये भारतातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे, खडकात कोरलेले हिंदू लेणी आणि मंदिर आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून हे मंदिर एका उड्डाणपुलाखाली (Flyover) लपलेले आहे.
मालाड येथे दाना-पाणी समुद्रकिनारा वसलेला आहे. एक शांत आणि क्वचितच गर्दी असलेला हा समुद्रकिनारा आहे. सूर्यास्ताचा येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.