Rajdoot Bike Price : ४६ वर्षांपूर्वी राजदूत फक्त 'इतक्या' हजारात मिळायची, खरेदीची पावती पाहून धक्का बसेल

Shreya Maskar

१९८०ची मोटरसायकल

१९८० च्या दशकातील मोटरसायकलचा कोणी उल्लेख केला, तर 'राजदूत' मोटरसायकलचे नाव नक्कीच समोर येईल. बाईच्या इंजिनमुळे या बाईकला भारतीय रस्त्यांवर एक विशेष ओळख मिळाली होती.

Motorcycle from 1980 | google

बाईकची जुनी Receipt व्हायरल

१९८० सालची भारत मोटर्सची एक जुनी पावती (Receipt) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Old Bike Receipt Goes Viral | google

राजदूत मोटरसायकल

२० जून, १९८० रोजीच्या या पावतीनुसार, एका व्यक्तीने १७५ सीसी राजदूत मोटरसायकल खरेदी केली होती. तिची मूळ किंमत फक्त ९,००० रुपये होती आणि १,००० रुपयांच्या करासह एकूण बिल १०,००० रुपये झाले होते.

Rajdoot Motorcycle | google

किंमत किती?

आजच्या जगात, जिथे केवळ सर्व्हिस आणि विम्यासाठी हजारो रुपये लागू शकतात, तिथे फक्त १०,००० रुपयांमध्ये संपूर्ण गाडी मिळणे हे चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही. त्या काळात 'राजदूत' बाईकला खूप मान होता.

money | pinterest

पैशाचे मूल्य

ही व्हायरल झालेली पावती आपल्याला दाखवते की काळानुसार पैशाचे मूल्य कसे बदलले आहे. व्हायरल होणारी रिसिप्ट MP Sahab या युजरने शेअर केली आहे.

Value of Money | google

युजरचे कॅप्शन

सोशल मीडियावर पावती शेअर करणाऱ्या युजरने लिहिले की, "आजच्या काळात मोटरसायकल किती परवडणारी आहे..."

Value of Money | google

२ एकर जमिनीची किंमत

युजरने पुढे लिहिलं की, "१९८० साली, एक अॅम्बेसेडर मोटरसायकल १०,००० रुपयांना मिळत होती. त्या वेळी एक एकर जमिनीची किंमत ५,००० रुपये होती, म्हणजेच ते वाहन २ एकर जमिनीच्या किमतीत मिळत होते. तर आज, २ एकर जमिनीची किंमत किमान ४० लाख रुपये आहे..."

Cost of 2 Acres of Land | google

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या व्हायरल पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काही जण याला 'जुने दिवस सोन्यासारखे' म्हणत आहेत, तर काही जण आजच्या ईएमआय आणि वाढत्या पेट्रोलच्या किमतींवर टीका करत आहेत.

Netizens' Comments | google

NEXT : सिंधुदुर्गपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन, उन्हाळ्यात निसर्गाच्या कुशीत मारा फेरफटका

Sindhudurg | google
येथे क्लिक करा...