Shreya Maskar
आंबोली हिल स्टेशन हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मडगाव जवळ आहे. पश्चिम घाटात सुमारे ७०० मीटर उंचीवर वसलेले हे एक शांत थंड हवेचे ठिकाण आहे.
'महाराष्ट्राची चेरापुंजी' म्हणून ओळखले जाणारे आंबोली हिल स्टेशन जास्त पाऊस, धुक्याने वेढलेला हिरवागार प्रदेश, असंख्य धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
आंबोली येथे खोल दऱ्या, कवळेसाद पॉईंटसारखी, सनसेट पॉईंट, माधवगड किल्ला, आंबोली धबधबा अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. तसेच आंबोली येथे ऐतिहासिक हिरण्यकेशी मंदिर देखील आहे.
आंबोली हिल स्टेशनला गेल्यावर तुम्हाला जवळून प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. येथे बेडूक, फुलपाखरे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात.
सावंतवाडी स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षा किंवा बसने आंबोली हिल स्टेशनला जाऊ शकता. सावंतवाडीपासून आंबोली हिल स्टेशन अवघ्या ३०-४० किमी अंतरावर आहे.
सिंधुदुर्गला गेल्यावर सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली समुद्रकिनारा, देवबाग , सुनामी बेट या प्रमुख्य पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.
आंबोली हिल स्टेशनला गेल्यावर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.