मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

ias transferred : ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जाणून घ्या कुणाची कुठे बदली झाली.
ias transferred
ias transferred Saam tv
Published On
Summary

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे प्रशासकीय बदल

दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत

मनीषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी देण्यात आलीये

IAS Transferred : ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रशासनात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनातील दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या बदल्यांचा निर्णय जारी करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मनिषा म्हैसकर पाटणकर यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. डॉ. आय. एस. जहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाल्याने बदली करण्यात आली आहे. मनिषा यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ias transferred
अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

मनीषा म्हैसकर आहेत तरी कोण ?

मनीषा म्हैसकर या १९९२ सालच्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या सनदी अधिकारी आहेत. म्हैसकर यांना जिल्हाधिकारी सांगली, विक्रीकर उपाआयुक्त मुंबई, पालिका आयुक्त अमरावती या विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. त्या महाराष्ट्राच्या माहिती महासंचालक पदावरही कार्यरत होत्या. तसेच त्या सार्वजनिक बांधकाम विभागातही अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होत्या.

ias transferred
ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

मिलिंद म्हैसकर कोण आहेत?

मिलिंद म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे आयएसएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा मुख्य कार्यकारी अधिकारी) उपाध्यक्ष म्हणून जबाबधारी सांभाळली आहे. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या वर्षांपासून त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com