ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

Sharmila Rohit Pimpalolkar : ठाण्यात महायुतीचा महापौरपदा प्रश्न मिटला आहे. ठाण्यात शिंदे गटाकडून महापौरपदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांनी अर्ज भरला आहे.
Sharmila Rohit Pimpalolkar
Sharmila Rohit Pimpalolkar Saam tv
Published On
Summary

महापौरपदी शिंदेसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर

उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील

निवड बिनविरोध होण्याची शक्यता

ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदे गटाच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांनी अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी अर्ज भरलाय. दोघांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे मानले जातंय. मात्र महापौरदपदाविषयी अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ठाण्याच्या महापौरपदी विराजमान होण्याची दाट शक्यता असलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांच्याविषयी जाणून घेऊया.

ठाण्याच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकला आहे. सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौरपदाची संधी दिली आहे.

शर्मिला पिंपळोलकर या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे महापौरपदावर दावा करणाऱ्या भाजपने अखेर उपमहापौरपदावर समाधान मानलं आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलाय.

Sharmila Rohit Pimpalolkar
कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

नाव - शर्मिला रोहित पिंपळोलकर गायकवाड

पत्ता - सी / ३०४, साई श्रद्धा बिल्डिंग, गोकुळधाम सी एच एस,

कोपरी कॉलनी, बारा बंगलो जवळ, सिध्दार्थ नगर, ठाणे ४००६०३

जन्म दिनांक : २५/०१/१९८२

वैवाहिक स्थिती - विवाहित

भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी

Sharmila Rohit Pimpalolkar
Ajit Pawar Death : विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

शैक्षणिक पात्रता - सध्या १४ वी बीए शिकत आहे. बारावी व दहावी मुंबई विद्यापीठ

कामाचा अनुभव -

शिवसेना नगरसेविका २०१७ ते २०२२ प्रभाग क्र. २०

नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष २०१७ ते २०१९

ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती सदस्य - २०२१ ते २०२२

कोरोना योद्धा पुरस्कार २०२१ ते २०२२

उत्कृष्ट नगरसेविका पुरस्कार २०२५

नगरसेविका कार्यकाळामध्ये केलेली महत्वाची कामे -

महाराष्ट्रातील पहिले छञपती संभाजी महाराज शौर्य शिल्प निर्मीती

सिध्दार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमशक्ती चौक

भगवान गौतम बुद्ध शिल्प

सिध्दार्थनगर गौतम बुध्द विहार निर्मितीकरता पाठ पुरावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com