

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
बारामती विमान अपघातात ५ जणांचा मृत्यू
मनगटावरील घड्याळामुळे दादांच्या मृतदेहाची ओळख पटली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या बारामतीकडे येणाऱ्या खासगी विमानाचे लँडिगदरम्यान नियंत्रण सुटलं. त्यानंतर विमान शेतात कोसळून स्फोट झाला. या विमान अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवणे देखील कठीण झालं होतं. या परिस्थितीत अजित पवारांच्या मनगटावर असलेल्या घडाळ्यामुळे ओळख पटल्याचे सूत्रांनी माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे घड्याळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांनी घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. महापालिका निवडणुकीतही घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन करत होते.
घड्याळ चिन्ह त्यांची ओळख पटली होती. अजित पवार हे राजकीय जीवनात 'दादा' म्हणून ओळख होती. त्यांनी राजकारणात मोठी ओळख निर्माण केली होती. बारामती विमानतळाजवळ सुमारे पावणे नऊ वाजता घडला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना विमान अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'अपघात झाल्याचे विमानतळ प्रशासनाला तातडीने कळवलं. स्फोट झाल्यानंतर पाण्याच्या बादल्या नेल्या. आम्ही घटनास्थळी काहीच करू शकलो नाही. आमच्या शेजारीच मृतदेह पडलेला होता. आमच्या जवळचा मृतदेह कोणाचा होता, हे माहिती नव्हतं. पण त्यानंतर कळालं की, तो मृतदेह अजितदादांचा होता. त्याचे शीर वेगळं होतं, तर धड वेगळं होतं. हातपाय फुगलेले होते'.
'आम्ही ब्लँकेट दिलं. अजित पवारांच्या हातात काही तरी होतं. त्यावरून माणसांनी ओळखलं की हे अजितदादाच आहेत. घटनास्थळी पाच मृतदेह होते. त्यातील दोन बाहेर पडल्या होत्या. तर तीन आत अडकून पडल्या होत्या. विमान जवळपास अर्धातास पेटत होते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.