अजित पवारांच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं? सखोल चौकशीसाठी टीम दाखल, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

ajit pawar plane accident : अजित पवारांच्या विमान अपघातावेळी नेमकं काय घडलं होतं, यावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी टीम दाखल झाली आहेत.
ajit pawar
baramati plane crashSaam tv
Published On
Summary

बारामती विमान अपघातात अजित पवारांच्या मृत्यूने महाराष्ट्रावर शोककळा

विमानाच्या लँडिंगच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याने आल्या अनेक अडचणी

विमान अपघाताबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

बारामतीमधील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विमानात अजित पवारांसह वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहायक कर्मचारी आणि दोन वैमानिक होते. अपघातानंतर Bombardier Aerospace कंपनीच्या विमान अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या अपघातावर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील २ केंद्रीय मंत्र्यांनी यांनी मोठं भाष्य केलं. दोन्ही मंत्र्यांनी अपघाताआधी काय घडलं, याविषयी माहिती दिली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'प्रथमदर्शनी धुक्याचा त्रास वाटतोय. त्यांचं एटीसीशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे की, दृश्यमानतेमुळे त्यांनी दोन वेळा हवेत घिरट्या मारल्या. त्यानंतर दृश्यमानता वाढल्याने लँडिग करू लागले. मात्र, त्याचवेळी दुर्दैवी घटना घडली. आमची एआयबीची टीम चौकशी करणार आहे. त्यानंतर निश्चितपणे काय कारण आहे, हे समोर येईल'.

ajit pawar
आधी ४ लेन, नंतर अचानक २ लेनचा झाला; मिरा-भाईंदरच्या १०० कोटींच्या फ्लायओव्हरच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितलं की, 'प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली, त्यातून समोर येतंय की, सकाळी ८.४८ वाजण्याच्या सुमारास लँडिंग करताना दृश्यमानता कमी होती. पायलट लँडिग करताना एटीसीशीच्या संपर्कात होते. त्यांनी दोन वेळा हवेत घिरट्या मारल्या. तिसऱ्यांदा प्रयत्न करत होते. त्यावेळीही लँडिग दृश्यमानता कमी होती. काही वेळांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर लँडिग करण्याचं ठरवलं. मात्र, लँडिग करतानाच अपघात झाला'.

ajit pawar
अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

तत्पूर्वी, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्सच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी विमान, उड्डाणाच्या नोंदी आणि अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com