

मिरा-भाईंदरमधील फ्लायओव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय
४ लेन ते २ लेन बदलावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जाताहेत
काँग्रेसकडून फ्लायओव्हर डिझाइनवर टीका
MMRDA flyover design : मिरा-भाईंदरचा फ्लायओव्हरवर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ४ लेनचा फ्लायओव्हर शेवटी अचानक २ लेनचा दिसतोय. या फ्लायओव्हरवरून नेटकऱ्यांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गेमचेंजर ठरणाऱ्या फ्लायओव्हरचं फेब्रुवारी महिन्यात उद्घाटन करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या दाव्यावर 'एमएमआरडीए'ने भाष्य केलं. 'व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्या व्हिडिओचा उद्देश हा डिझाइन दाखवण्याचा नाही. खरंतर ४ लेनचा फ्लायओव्हर २ लेन होणे डिझाइनमधील दोष नाही. तर रस्त्याच्या रुंदी आणि भविष्यातील नेटवर्क नियोजनावर आधारलेला आहे.
फ्लायओव्हर मेट्रो लाइन-९ अंतर्गत तयार करण्यात येत आहे. फ्लायओव्हरचा डबल डेकर ढाचा पुढे अंधेरी पश्चिमला जोडण्यात येणार आहे. हा प्रकप्लाचं बांधकाम जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स करत आहे. या फ्लायओव्हरच्या वरून एलिवेटेड मेट्रो कॉरिडर तयार करण्यात येत आहे. तर खालच्या बाजून रस्त्यावर वाहनांची येजा सुरू राहील. या फ्लायओव्हरमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल.
फ्लायओव्हरचे दोन लोन भाईंदर पूर्वच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांसाठी असतील. तर भाईंदर पश्चिमला जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन असतील. भाईंदर पूर्वच्या दिशेने जाणारा भागा आधी येतो, त्यामुळे ४ लेनचा फ्लायओव्हर दोन लेनमध्ये बदलताना दिसतोय.
फ्लायओव्हरच्या दोन लेनवरून काँग्रेसने खिल्ली उडवली. 'महाराष्ट्रात इंजिनीअरिंगचा चमत्कार पाहा. एक चार लेन फ्लायओव्हर अचानक दोन लेनमध्ये बदलतोय. महाराष्ट्र असो मध्य प्रदेशमधील भाजप सरकारचे धोकादायक चमत्कार सामान्य होताना दिसत आहे. फ्लायओव्हर लोकांना त्रासदायक होवो किंवा अपघातात मृत्यू होऊ दे, भाजप सरकारला काही फरक पडत नाही, अशा शब्दात काँग्रेसने टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.