गायिका अंजली भारतीला दणका; अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, राज्य महिला आयोगाकडून कारवाईसाठी पहिलं पाऊल

anjali bharati controversy : गायिका अंजली भारतीला मोठा दणका बसणार आहे. अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य अंजली भारतीला भोवण्याची शक्यता आहे.
anjali bharati news
anjali bharati Saam tv
Published On
Summary

गायिका अंजली भारती आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडली

अमृता फडणवीस यांच्याविरोधातील वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला

तिच्या वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

नागपुरातील गायिका अंजली भारती वादात सापडली आहे. अंजली भारतीने भंडाऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चहुबाजूंनी टीका होत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अंजली भारतीवर कारवाईची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी अंजलीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता अंजली भारतीच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

अंजली भारतीने भंडाऱ्यातील अशोक नगर येथे १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अंजली भारतीच्या वक्तव्याची आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

anjali bharati news
भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

सार्वजनिक कार्यक्रमात अपशब्द वापरून महिलेचा अपमान करणे, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

धर्मपाल मेश्राम काय म्हणाले?

अंजली भारतीच्या वक्तव्यावर भाजपचे धर्मपाल मेश्राम यांनी म्हटलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आयोजित भीम मेळाव्यात गायिका अंजली भारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी भंडारा जिल्ह्यातील फुलमोगरा या गावात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. भाजपच्या वतीने या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला.

anjali bharati news
सहर शेख यांच्या विधानावरून भाजपमध्ये मतभेद; हिरव्या रंगावरून मंत्री गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य, VIDEO

भाजपचे प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संबंधित महिला आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीसाठी मर्यादा ओलांडून केलेले हे वक्तव्य महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यापुढे परवानगी देऊ नये, अशी मागणीही धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com