

कोकणात महायुतीचा डंका
महायुतीने तब्बल २५ जागा जिंकल्या बिनविरोध
पालकमंत्री नितेश राणेंची रणनीती ठरली यशस्वी
गणेश कवडे, साम टीव्ही
कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने तब्बल २५ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणेंची धुरंदर रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. झेडपीच्या ८, तर पंचायत समितीच्या १७ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचे १ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. तर १०० सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे १६ आणि शिंदे शिवसेनेचा १ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( ८ बिनविरोध)
१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा; प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)
६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)
७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)
८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
पंचायत समिती कणकवली( ६ बिनविरोध)
१)वरवडे ; सोनू सावंत (भाजप)
२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)
६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)
पंचायत समिती वैभववाडी( १ बिनविरोध)
१) कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
पंचायत समिती वेंगुर्ले ( १ बिनविरोध)
१)आसोली; संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती ( १ बिनविरोध)
१)अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती ( १ बिनविरोध)
१)शेरले; महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती ( १ बिनविरोध)
१)कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.