

नगरसेवकांचे पोस्टर लावण्याच्या प्रकरणात ट्विस्ट
प्रकरणाच्या आरोप-प्रत्यारोपादरम्यान नेत्याचा मृत्यू
ठाकरे गटाच्या नेत्याच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते आक्रमक
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पूर्वेत बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्याच्या प्रकरणातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश मात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने थेट प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
कल्याण पूर्वेत ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्या विरोधात ठाकरे गटांनी कोळसेवाडी परिसरात पोस्टर लावले होते. या पोस्टरवर आमचे बेपत्ता नगरसेवक दिसल्यास शाखेत संपर्क साधा असा मजकूर देखील दिला होता. मात्र हे पोस्टर लावण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पोस्टर लावल्यानंतर बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या या पोस्टल लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस ठकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार फोन करत असून पोलिसांनी दबाव टाकल्यामुळेच टिके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
या प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, युवा अध्यक्ष नीरज कुमार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधित नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे आणि प्रशासनाविरोधात 302 कलमान्वये हत्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. हरवलेले नगरसेवक शोधण्याच्या चांगल्या हेतूनेच पोस्टर लावले होते, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. यानंतर राजकीय दबावाखाली खोटी बदनामीची तक्रार दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पोलिसांच्या सततच्या दबावामुळे रमेश टिके मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने तीव्र निषेध नोंदवला आहे. वेळ आली तर शहर बंद व उग्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.