पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

ajit pawar statue : पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार यावं, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.
BJP MLA Mahesh
Ajit Pawar MemorialSaam tv
Published On
Summary

अजित पवारांच्या स्मारकासाठी भाजप नेते महेश लांडगे यांचं महापालिकेला पत्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर पुतळ्याची मागणी केलीये

नवीन सभागृहाला अजित पवारांचे नाव देण्याचाही आमदार लांडगेंनी मांडला

अजित पवारांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादांच्या जाण्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही दु:खाचं वातावरण पसरलं आहे. विविध भागात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याचदरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात यावं, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर पूर्णाकृती ब्राँझ धातूचा पुतळा उभारून स्मारक उभारण्यात यावं, नवीन सभागृहाला अजित पवार यांचे नाव देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अजितसृष्टी उभारण्यात यावी. या मागणीसाठी भोसरी विधानसभाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एक पत्र लिहिलं आहे.

BJP MLA Mahesh
Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महेश लांडगे यांनी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका केली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लिहिलेलं पत्र सध्या पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

BJP MLA Mahesh
कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये लोकनेते दिवगंत मुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि अविस्मरणीय राहील आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत, औद्योगिक प्रगती तसेच नागरी प्रशासनाशी संबंधित विविध निर्णयामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या प्रकारचा उल्लेख महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com