Election Commission Press Conference  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election: तयारीला लागा! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून महत्वाची अपडेट

Election Commission On Maharashtra Assembly Election 2024 Dates: केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. १६ ऑगस्ट २०२४

लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी?

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठी घोषणा केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी महत्वाची पत्रकार परिषद घेत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबरला तर जम्मू- काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूका होणार असल्याची घोषणा केली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

निवडणूक आयोगाने दिले मोठे संकेत!

"महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका यापूर्वी एकत्र झाल्या होत्या. यापूर्वी 3 निवडणुका एकत्र होत होत्या यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुकासोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात," असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

तसेच "सुरक्षा पुरवण्याचा कारणावरून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुकासोबत घेतल्या नाहीत, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुरळा सध्यातरी लांबणीवर गेल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT