Maharashtra Politics: ब्रेकिंग! नारायण राणेंना उच्च न्यायालयाकडून समन्स; खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Summons to Narayan Rane by High Court Maharashtra Political Updates: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली होती.
Maharashtra Politics: ब्रेकिंग! नारायण राणेंना हायकोर्टाकडून समन्स; खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Vinayak Raut Narayan Rane| Maharashtra Politics Breaking News: saam tv
Published On

सचिन गाड| मुंबई, ता. १६ ऑगस्ट २०२४

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली होती. या प्रकरणी आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स पाठवले आहे. कोर्टाने नारायण राणे यांना १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Politics: ब्रेकिंग! नारायण राणेंना हायकोर्टाकडून समन्स; खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! निम्म्या शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका?

नारायण राणेंना हायकोर्टाकडून समन्स!

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स पाठवले आहे.

खासदारकी धोक्यात?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. याचप्रकरणी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स पाठवले असून १२ सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी होणाऱ्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: ब्रेकिंग! नारायण राणेंना हायकोर्टाकडून समन्स; खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Maharashtra Politics : मुंबईत आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?

काय आहे प्रकरण?

दरम्यान, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत विनायक राऊत यांना पराभव स्विकारावा लागला. मात्र नारायण राणे यांनी पैशाच्या जीवावर विजय मिळवला असून मतदारांना धमकावून, पैसे वाटून मिळवलेली खासदारकी रद्द करा, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली होती. याबाबत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचप्रकरणी आता न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स पाठवले आहे.

Maharashtra Politics: ब्रेकिंग! नारायण राणेंना हायकोर्टाकडून समन्स; खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Nagpur News: नसतं धाडस जीवावर बेतलं! स्टंटबाजी करायला गेला अन् घडलं भयंकर; तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com