Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुंबईतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग; मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांची हवाच काढली, VIDEO

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरही मोठं वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरेंनी मुंबईतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग, मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांची हवाच काढली
Uddhav Thackeray :Saam tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीने आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीने पहिल्यांदा जाहीर मेळावा आयोजित केला. मेळाव्याला सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात सुरुवातीलाच उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरही मोठं वक्तव्य केलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

लोकसभेची लढाई संविधानासाठी लढाई होती. आताची लढाई महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृतीची लढाईची आहे. हे महाराष्ट्र लुटायला आले आहेत.

आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी. आम्ही तयार आहोत.

उद्धव ठाकरेंनी मुंबईतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग, मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांची हवाच काढली
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बडा नेता फुटला, थेट काँग्रेसमध्ये प्रवेश

ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत. लढाई अशी लढायची की, फक्त तू राहशील नाहीतर मी राहील. पण आपल्या तीन पक्षात असं नको.

जे महाराष्ट्र लुटायला आलेत त्यांच्यासोबत आपली लढाई आहे. एकतर तू राहशील, नाहीतर मी राहीन. सरकारला आता जाग आली.

आता रक्षाबंधन साजरा करताहेत. आपण शपथ घेतली पाहिजे. महाराष्ट्राचं हित जपलं पाहिजे. त्यांना खाली खेचा.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरून चर्चा सुरू आहे. मी आता सांगतोय.. मंचावर पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला आता जाहीर पाठिंबा देईन.

मी खुर्चीसाठी लढत नाही. महायुतीत असताना ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा रणनिती ठरली. त्यामुळे ते एकमेकांच्या जागा पाडण्यात व्यग्र होते. मात्र आपण पुढे जाताना आधी ठरवा, मग पुढे चला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, मग पुढे जाऊया.

उद्धव ठाकरेंनी मुंबईतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग, मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांची हवाच काढली
Sanjay Raut : हप्ते गोळा करायचे अन् दिल्ली चरणी वाहायचे; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार, सगळा इतिहासच काढला! VIDEO

आम्हाला मोदी सरकार नकोय. भारत सरकार हवंय. चाय पे चर्चा करतात, योजनांवर चर्चा करा. घोषणा केल्यात...लाडकी बहीण योजना...पण पैसे कुठून आणायचे? कोर्ट सांगतंय, तुमच्याकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, कोर्ट म्हणाले, तुमची लाडकी बहीण योजना बंद करायची का?

मुंबईत बेसुमार खोदकाम सुरु आहे. धरणे भरली तरी मुंबईकरांची तहान भगत नाही. कारण तुम्ही खोदून ठेवले आहे. सोन्याची कोंबडी म्हणून तुम्ही मुंबईकडे बघत असाल, तर मुंबईकर तुम्हाला दाखवून देतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com