Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बडा नेता फुटला, थेट काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP Leader Shishupal Patle Join Congress : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीला आणखी मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला लागलाय.
BJP Leader Shishupal Patle Join Congress
BJP Leader Shishupal Patle Join CongressSaam TV
Published On

विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीला आणखी मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला लागलाय. माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आज बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. पोवार समाजाचे नेते म्हमून शिशुपाल पटले यांची ओळख आहे.

BJP Leader Shishupal Patle Join Congress
Maharashtra Politics : मुंबईत आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?

2004 साली पटले हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. भंडारा-गोंदिया मतदार संघात शिशुपाल पटले यांची मोठी ताकद आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार पडला. याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून महायुतीचे नेते सतर्क झाले.

त्यांनी आतापासून विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली. मात्र, महायुतीतील तिन्ही घटकपक्षातील मतभेद आणि नाराजी यावरून अनेक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विद्यमान आमदार देखील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत.

त्याचबरोबर भाजपचे माजी आमदार तसेच खासदार आणि शिंदे गटातील काही नेते देखील महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. दरम्यान, पक्षासाठी काम करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार आपले म्हणणे ऐकत नाही म्हणून आपण भाजपला रामराम केल्याचं शिशुपाल पटले यांनी म्हटलंय.

शिशुपाल पटले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पोवार समाजातील नेतृत्व भाजपाने गमावले आहे. त्यांच्यापाठोपाठ भंडाऱ्यातील अनेक भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या वाट धरण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस तुमसर विधानसभेतून शिशुपाल पटले यांना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

BJP Leader Shishupal Patle Join Congress
Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा पहिला उमेदवार ठरला? भाजपच्या माजी खासदाराची सून मैदानात उतरणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com