सचिन गाड| मुंबई, ता. १६ ऑगस्ट २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राला संकटातून सोडवायचं आहे, असे म्हणत विधानसभेची तुतारी फुंकली. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"प्रत्येक नेत्याने महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी काय करायची गरज आहे याचं मार्गदर्शन केले. अजूनही देशावरच संकट पूर्ण गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेत काही प्रमाणात यश आले, पण संविधानावरील संकट पूर्ण गेलं असं निष्कर्ष काढता काम नये, कारण अद्यापही देशाची सूत्र त्यांच्याकडे आहेत," असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
"अधिवेशनात देशाचे प्रधानमंत्री एकदाही संसदेत आले नाहीत. संसदेच्या महत्त्वाच्या कामकाजाकडे ढुंकूनही पाहिले नाही याची प्रचिती आली. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला विरोधीपक्ष नेते राहुल गांधींना मागच्या ओळीत बसवले होते. मी देखील विरोधीपक्ष नेता होतो, मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेत्या होत्या त्या पहिल्या ओळीत त्या बसल्या होत्या. केंद्र सरकारकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचा मान राखला गेला नाही, त्यामुळे आपण जागरुक राहण्याची गरज आहे," असं शरद पवार म्हणाले.
"दोन महिन्यात निवडणुका आहे. त्याहीपेक्षा दिवस कमी आहेत. तिन्ही पक्ष आणि इतर पक्षांनी लोकांमध्ये जाऊन परिवर्तनाचा विचार त्यांच्यामध्ये रुजवायला पाहिजे, चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढायला हवी. यांच्या चुकीच्या कारभाराची अनेक उदाहरणे देता येतील. निवडणुकीला सगळ्यांना एकत्र घेऊन एकजुटीने समोर जायचे आहे. आमच्या सगळ्यांच्या कडून प्रयत्न केले जातील त्यात तुमची साथ हवी, कष्ट करण्याची तयारी ठेवा," असे आवाहन शरद पवार यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.