Eknath Shinde Resign Eknath Shinde Resign
महाराष्ट्र

Eknath Shinde Resign : एकनाथ शिंदेंचा राजीनामा, पुढचा मुख्यमंत्री कोण? राजभवनावर हालचालींना वेग

Eknath Shinde Resigned from the Post of Chief Minister (CM) : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजभवानावरील घडमोडी वेगात सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे. आज, २६ नोव्हेंबर रोजी सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता राजभवानावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिलाय. पुढील विधेनसभेच्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार -

तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देणे अपेक्षित होतं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

नव्या सरकारचा शपथविधी कधी? Maharashtra news CM

महायुतीचे सरकार स्पष्ट झालेय. सूत्रांच्या माहितीनुसार, २ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांना १७८ आमदारांचा पाठिंबा असल्याचं समजतेय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,असे बोलले जातेय.

काही आमदारही घेणार शपथ -

मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथ घेणार असल्याचे समजतेय. २० आमदार शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे दहा आमदार , अजितपवार गटातील पाच आमदार तर शिंदे गटातील पाच आमदार असे आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT