Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis News : महायुतीच्या यशावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या यशावरून त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
Devendra Fadnavis
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीच्या या मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. या अभूतपूर्व यशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचा मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. या यशावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्या या विजयामध्ये छोटासा सहभाग आहे. माझ्या संपूर्ण टीमने विजय खेचून आणला आहे. मला वाटतंय की, लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असला पाहिजे. जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आले. त्यांचा सन्मान करू. त्यांच्या गोष्टींना सन्मान देऊ'.

Devendra Fadnavis
Chahat Pandey: अभिनयात पास पण राजकारणात नापास; 'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीचा दारुण पराभव!

'झारखंडमध्ये जेएमएम जिंकला तर तेथील इव्हीएम चांगलं आहे. पराभवामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. इव्हीएममध्ये घोळ आहे. त्यांनी कुठं तरी चिंतन केलं पाहिजे. त्याची कारणे काय आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. लोकशाहीत लोक कोणाला डोक्यावर घेईल. तर कोणाला पराभूत करेल. हे या निवडणुकीने दाखवलं आहे, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

'मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणीवस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना दिलं. फडणवीसांनी यावेळी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com