Eknath Shinde yandex
महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपनं घ्यावा, आमचा पूर्ण पाठिंबा; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

BJP will Take a decision on the Post of Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्रिपदाबाबतच्या निर्णयाला माझा भाजपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Priya More

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? अशी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा, तसेच यावरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. 'भाजप निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. भाजपच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.', असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांची जनतेचे आभार मानले. 'हा विजय सर्वात मोठा आहे. अडीच वर्षांत महायुतीने जी काही कामं केली त्यावर लोकांनी विश्वास ठेवला.', असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला दादा भुसे, संजय शिरसाट हे देखील उपस्थित राहिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'एवढा मोठा विजय मिळाला आहे. हा लँडस्लाइड व्हिक्टरी आहे. याआधी पाहायला मिळाला नाही. यावेळेस पाहतोय. अडीच वर्षांत महायुतीने केलेली कामं आहे, महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. एकीकडे विकासकामे, महाविकास आघाडीने थांबवलेली कामे पुढे नेली. आज त्याचे प्रतिबिंब पाहतोय. दुसरीकडे कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मला वाटतं हा विजय जनतेचा विजय आहे.'

तसंच, 'महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कामं केली. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन-तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा सभा असायची. हे सत्र पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान चाललं. मी ८०-९० सभा घेतल्या. प्रवास मोठा केला. पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात तसं. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो तसं काल, आज आणि उद्याही काम करेल. ', असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा उल्लेख करत सांगितले की, 'मी स्वतःला मुख्यमंत्री म्हणून मी कधीच समजलो नाही. कॉमनमॅन म्हणून काम केलं. या धारणेमुळं मला कॉमन मॅनमध्ये जाताना कोणताही अडथळा आला नाही. या कॉमन मॅनसाठी, सर्वसामान्यांसाठी काही केलं पाहिजे असं वाटायचं. मी देखील शेतकरी, सामान्य कुटुंबातून आलोय. त्यांच्या वेदना व्यथा मी पाहिल्या आहेत.'

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, 'ज्या दिवशी अशाप्रकारचा अधिकार येईळ. त्यावेळी मी सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ, शेतकरी, रुग्ण या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे, अशी भावना माझ्या मनात होती. त्यातून जावं लागतं त्याशिवाय ते कळणार कसे. गरिब कुटुंबातून आल्याने मला वेदना समजत होत्या. तेच मी यावेळेस केलं. महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणी, शेतकरी, भाऊ आणि इतर सर्व घटकांसाठी इकोसिस्टिम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.'

एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाजपचं आभार मानत सांगितले की, 'आम्ही चट्टाण की तरह आपके पिछे खडे आहे. अडीच वर्षे ते पूर्ण ताकदीने उभे राहिले. सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. ते दिवस आठवतात. प्रत्येक दिवसाचा आणि क्षणाचा वापर राज्याच्या जनतेच्या हिताचा विचार केला. अडीच वर्षांच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग आहे. त्याचं कारण समविचारी सरकार असतात. राज्यात आणि केंद्रात त्यावेळी प्रगतीचा वेग गतिमान होतो. हे सगळं अडीच वर्षांच्या कारकीर्दीत खूप समाधानी आहे. आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.'

एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे यावेळी आभार मानले. 'हे जे काही आहे ते मी पाहतोय की प्रचंड असा राज्याच्या प्रगतीचा वेग वाढलाय. राज्य एक नंबरला नेण्याचे काम केले. महायुतीचं सरकार होतं तेव्हा पुढे होतं. मागच्या अडीच वर्षांतही पुन्हा पहिल्या नंबरला राज्य आणलं. या राज्यात जे अडीच वर्षांत काम केलं त्यामुळे या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला. लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झाली. सावत्र भावांना लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. आणि पूर्णपणे त्यांनी लक्षात ठेवलं.', असं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT