Surabhi Jayashree Jagdish
नेहमीप्रमाणे हिल स्टेशन किंवा किल्ल्यांवर फिरायला जाण्याऐवजी तुम्ही वेगळा पर्याय शोधत असाल तर काजवा महोत्सव हा एक पर्याय ठरू शकतो. भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात काजवे दिसतात.
काजवा महोत्सवामध्ये अंधार पडताच झाडांवर आणि जंगलात असंख्य काजवे चमकताना दिसतात. हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक रात्री विशेष फेरफटका मारतात.
काजवा महोत्सवाचा कालावधी साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या काही आठवड्यांपर्यंत असतो. पावसाळ्यापूर्वीची दमट हवा काजव्यांच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे या काळात त्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते.
तुम्हाला अजून जवळ कोणत्या ठिकाणी फिरायचं असेल तर भंडारदऱ्यातील आर्थर लेक हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तलावाच्या काठावर बसून सभोवतालच्या डोंगररांगांचं सुंदर दृश्य पाहता येतं.
रंधा धबधबा हा भंडारदऱ्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात प्रवरा नदीचे पाणी मोठ्या वेगाने कोसळताना पाहणं हा अनुभव मस्त असतो. धबधब्याच्या परिसरात निसर्ग निरीक्षणासाठीही उत्तम संधी मिळते.
विल्सन धरण हे भारतातील जुन्या धरणांपैकी एक मानलं जातं. धरणाच्या परिसरातून तलाव आणि डोंगरांचं मनमोहक दृश्य पाहायला मिळतं. पावसाळ्यात परिसर अधिक हिरवागार झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढते.
अंब्रेला फॉल्स हा भंडारदऱ्यातील धबधबा असून पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसतो. पाण्याचा प्रवाह छत्रीसारखा दिसत असल्यामुळे या धबधब्याला हे नाव पडलंय.