Eknath Shinde likely to announce Rahul Shewale as Shiv Sena’s Rajya Sabha candidate amid high political suspense in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

Eknath Shinde Rajya Sabha Candidate Final Announcement: राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत. राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा; अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष.

Omkar Sonawane

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणाचे नाव निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाविकासआघाडीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कॉँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला.

भाजपकडून देखील रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे चारही उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत अनपेक्षित दोन चेहऱ्यांनी संधी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील अनेक नावांची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक खासदारांची तिकिटे कापल्या गेली होती. तसेच नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी बरेच दिवस ताटकळत उभे राहावे लागले. उमेदवारीला उशीर झाल्याने पराभव झाल्याचा ठपका गोडसे यांनी ठेवला होता. यामुळे त्यांचे ही नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. मात्र माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित केले आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे.

या 5 नावांची होती चर्चा

शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांचेही नाव चर्चेत होते. तर पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी ही जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र राहुल शेवाळे यांचे नाव जाहीर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अंतिम चर्चा सुरू असून गुरुवार (दि.5) ला अधिकृत नाव जाहीर होणार आहे.

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्ज रोजी अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT