कंगनानंतर रामदेव बाबांनीही तोडले तारे, रामदेव म्हणतात जेन-झींमुळे भारताची बदनामी

Gen-Z Protests Spark Row as Ramdev Baba: जंतरमंतरवरील जेन-झी आंदोलनावरून आता रामदेव बाबांनीही तारे तोडलेत...जेन-झींमुळे भारताची बदनामी झाल्याचा आरोप रामदेव बाबांनी केलाय.... त्यामुळे जेन झी आंदोलक आणि विरोधक कसे आक्रमक झालेत...पाहूयात या रिपोर्टमधून...
RAMDEV BABA TARGETS GEN-Z PROTESTERS AFTER JANTAR MANTAR ROW
RAMDEV BABA TARGETS GEN-Z PROTESTERS AFTER JANTAR MANTAR ROWsaam tv
Published On

जंतर मंजरवरील आंदोलनानंतर आता जेनझी निशाण्यावर आलीय. भाजप खासदार कंगना रणौतनंतर आता योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील तारे तोडले आहेत. जंतर-मंतरवरील तरुण आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाल्याचा अजब दावा रामदेव बाबांनी केलाय़. तर रामदेवबाबांच्या विधानाचा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी चांगलाच समाचार घेतलाय.

सीजेपीनंतर विद्यार्थी संघटनांनीही रामदेव बाबांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तेव्हा रामदेव बाबा गप्प का होते? असा सवाल जेनझी आंदोलकांनी केलाय. तर रामदेव बाबांनी 2011 मध्ये आंदोलन केलं तेव्हा देशाची बदनामी झाली नाही का? असा उलट सवाल संजय राऊतांनी केलाय.

जंतरमंतरवर आंदोलन सुरू असताना बोलण्याचं कुणी धैर्य दाखवलं नाही. मात्र आता जेन-झींना टार्गेट करण्यासाठी आता एक-एक जण समोर येतायंत. आधी कंगना रनौतनं नको त्या शब्दात आंदोलक तरुणांवर गरळ ओकली. आता रामदेव बाबांनी बदनामीचं हत्यार बाहेर काढलं...जर आंदोलनामुळे देशाची बदनामी होत असेल तर मग आंदोलन करण्याची वेळ का आली याचाही विचार रामदेवबाबांसारख्या ढुढ्ढाचार्यांनी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com