संघर्ष गांगुर्डे,साम टीव्ही
कल्याण मध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केडीएमसी मुख्यालय लगत असलेल्या शाळेत गुरु पूर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न करून 14 वर्षाची विद्यार्थिनी सुभाष मैदान परिसरात फिरत असताना तिच्या सोबत एका नराधमाने अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी एक तासात या प्रकरणातील आरोपी भावेश अहिर याला बेड्या ठोकल्या आहेत.
विद्यार्थिनी मैदान परिसरात फिरत असताना मैदानात असलेल्या उद्यानात एक तरुण भेटला. तुला नवीन कपडे घेऊन देतो मोबाईल घेऊन देतो असे सांगून तिच्या हात पकडला. तिला उद्यान मध्ये ओढले. पाऊस सुरू असल्याने सध्या सुभाष मैदानात लोक नसतात . मात्र केडीएमची मुख्यालय आणि सुभाष मैदान याची भिंत एकच आहे .तरुणाने विद्यार्थीसोबत अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला .
पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या पदाधिकाऱ्याची मुलगी आहे. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल आरोपी भावेश अहिर याला एक तासात अटक केली. पुढील तपास सुरू आहे. या उद्यानात पाच वाजेनंतर नशेखोरांचा वावर असतो. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी महापालिकेला तक्रार करीत आहे. मात्र केडीएमसीने अद्याप या प्रकरणात कोणती कारवाई केली नाही. आता हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नक्की तो नराधम कोण आहे आणि तिथे कशासाठी आला होता. याचा शोध बाजारपेठ पोलीस करीत आहे. मात्र ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.