Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Marathi Breaking Live Headlines Updates : संसदेचे पावसाळी अधिवेशन, राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv

LPG गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरून काळा बाजार करणार रॅकेट पकडलं.

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव शहरा नजीक सुदर्शन हॉटेल शेजारी असलेल्या एका पडक्या घरात महामार्गावरून एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅसची चोरी करताना अन्न व पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून टँकर मधून एलपीजी गॅसची चोरी होताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी राज्यदक्षता पथकाला या अशाप्रकारे गॅस चोरीच परिसरात मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून हा गॅस चोरीचा व काळ्या बाजाराचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता.

१ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना परत जावे लागल्याची तक्रार आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होत असल्याने अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी एसटी प्रशासनाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा ६ टक्के जास्त पाणीसाठा

सततच्या संतधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चिंता मिटली

खडकवासला १०० टक्के तर पानशेत ९८ टक्के भरले

गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा ८८ टक्के होता मात्र यंदा तो ९४ टक्क्यांवर

खडकवासला: १०० टक्के

पानशेत: ९८.३८ टक्के

वरसगाव: ९३.४९ टक्के

टेमघर: ८१.६९ टक्के

एकूण पाणीसाठा: ९४.२२ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com