D. Y Patil Death Saam Tv
महाराष्ट्र

D. Y Patil Death: पद्मश्री डी. वाय पाटील यांचं निधन, शिक्षण अन् राजकीय वर्तुळात शोककळा

D. Y Patil Passes Away: शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी वाय पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

Priya More
  • पद्मश्री डी वाय पाटील यांचे निधन

  • ते डी. वाय पाटील ग्रुपचे संस्थापक होते

  • कोल्हापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला

  • शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात शोककळा

रणजित माजगावकर, कोल्हापूर

'शिक्षणसम्राट' आणि पद्मश्री डी. वाय पाटील यांचं निधन झालं. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी कोल्हापूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

डी. वाय पाटील यांचे नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असे होते. ते एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक होते. शिक्षणसम्राट म्हणून त्यांची ओळख होती. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे ते माजी राज्यपाल होते. प्रसिद्ध डी. वाय. पाटील ग्रुपचे ते संस्थापक देखील होते. डी. वाय पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षण, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते. डी. वाय पाटील यांच्या नावाने अनेक कॉलेज आणि रुग्णालय महाराष्ट्रात आहेत.

डी. वाय पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला होता. १९५७ के १९६२ दरम्यान ते कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ ते १९७२ या काळात ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर १९७८ साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांचा राजकारणामधील रस कमी झाला.

डी. वाय पाटील यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी राजकारणातून सन्यास घेतला. १९८३ मध्ये त्यांनी नवी मुंबईमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रामध्येच बरीच कामं केली. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT