donate blood appeals ima gondia  Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर गाेंदियात 40 पेक्षा अधिक डाॅक्टरांकडून रक्तदान, नागरिकांनी पुढाकार घ्यावा

खासदार सुनील मेंढे यांनी देखील वैद्यकीय अधिका-यांना रक्तदानासाठी कॅम्प घ्यावेत असे आवाहन केले.

Siddharth Latkar

- हरीश माेटघरे

Gondia News :

गोंदियातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तूटवडा असल्याचे साम टीव्हीने वृत्त प्रसारित करताच गोंदिया जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA Gondia) डाॅक्टरांनी पुढाकार घेत तब्बल 40 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. नागरिकांनी देखील रक्तदान (Blood Donation) करावे असे आवाहन आयएमएने केले आहे. (Maharashtra News)

गोंदियाच्या गंगा बाई शासकीय स्त्री रुग्णालयात महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह छतीसगड राज्यातील महिला रुग्ण मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी येत असतात. प्रसूती दरम्यान महिलांना रक्ताची गरज भासते. सोबतच शिकलसेल रुगणना रक्त लागत असते. सध्या या रुग्णालयात आवश्यकते एवढा रक्तसाठा उपलब्ध नसल्याचे समाेर आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीने रुग्णालयातील रक्त तुटवड्याचे वृत्त प्रसारित करुन नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. खासदार सुनील मेंढे यांनी देखील वैद्यकीय अधिका-यांना रक्तदानासाठी कॅम्प घ्यावेत असे आवाहन केले.

दरम्यान गोंदियातील आयएमएच्या सुमारे 40 डॉक्टरांनी स्वतः रक्तदान केले. तसेच नागरिकांनी रक्तदानास पुढे यावे असे आवाहन डॉ जितेंद्र गुप्ता (IMA अध्यक्ष, गोंदिया) तसेच डॉ. जुही भालोटिया (महिला रोगतज्ञ) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT