MP Sunil Mendhe
MP Sunil Mendhesaam tv

Donate Blood : महिला रुग्णालयात रक्ताचा तुटवडा... खासदार संतापले, स्वत:ला सावरत वैद्यकीय अधिका-यांना कॅम्प घेण्याचे केलं आवाहन

shortage of blood in gondia general hospital : गोंदियात छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येत असतात.
Published on

- हरीश माेटघरे

Gondia News :

गोंदियातील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी खासदार सुनील मेंढे (mp sunil mendhe) यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रक्तदान कॅम्प घ्यावेत अशी सूचना केली. नागरिक रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतात तुम्ही सर्व लाेकप्रतिनिधींना देखील आवाहन करा ते देखील कॅम्पसाठी पुढाकार घेतील असेही मेढें यांनी नमूद केले. दरम्यान हा संवाद साधताना खासदार मेंढेंनी वैद्यकीय अधिका-यांना झापल्याचे एका व्हिडीओतून समाेर आले आहे. (Maharashtra News)

गोंदियाच्या शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याने महिला रुग्णांचा होणारा त्रास पाहता भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले हाेते.

MP Sunil Mendhe
Gadchiroli News : पाच लाखांच्या लाच प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला अटक

गोंदियात बाई गंगाबाई हा एकमेव स्त्री रुग्णालय असुन छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येत असतात. त्यामुळे रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याने खासदारांनी गोंदिया येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावत याप्रकाराचा जाब विचारला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. खासदार मेंढे यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संभाषणाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल हाेत आहे. यामध्ये खासदार सुनील मेंढे हे वैद्यकीय अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांना कधी समाजवून सांगत हाेते तर कधी त्यांना झापत असल्याचे दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

MP Sunil Mendhe
Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका 'शाे काॅज' ला उत्तर देतील? तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com