ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचं गुपित उघड, नेमकी काय चर्चा झाली?

Raj Thackeray Meet Eknath Shinde: राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली... मात्र या भेटीवरून राजकारणाची चर्चा रंगलेली असतानाच ठाकरेंनी स्वत: या भेटीमागचं कारण स्पष्ट केलयं... त्यामुळे राज ठाकरेंनी शिंदेंना नेमकं का भेटले? शिंदेंपुढे ठाकरेंनी कोणती समस्या मांडली?
Raj Thackeray meets Deputy CM Eknath Shinde at his residence to discuss Mumbai’s parking and traffic concerns
Raj Thackeray meets Deputy CM Eknath Shinde at his residence to discuss Mumbai’s parking and traffic concernsSaam Tv
Published On

उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोध मानल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंनी नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली...तब्बल अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत... मात्र आता राज ठाकरेंनीच माध्यमांसमोर भेटीचं कारण स्पष्ट केलयं...

मुंबईतील पार्किंग' आणि 'वाहतूक कोंडी'च्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्याचं सांगून राज ठाकरे थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नसल्याचंही ठणकावून सांगितलं. यासंदर्भात मुख्यमंत्र्य़ांचीही भेट घेणार असल्याचं सूचक विधान त्यांनी केलयं. मात्र राज-शिंदे भेटीवर संजय राऊतांनी उघड नाराजी व्यक्त केलीय...

एकूणच महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरेसेनेत चांगलाच दूरावा निर्माण झाल्याचं दिसतयं...मात्र हा दुरावा का निर्माण झाला पाहूयात...कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानं ठाकरेसेनेत नाराजी आहे... तर चंद्रपुरात ठाकरेसेना भाजपसोबत गेल्यानं मनसेकडून ठाकरेसेनेला लक्ष्य करण्यात आलं... तसचं मुंबईतही ठाकरेसेनेनं निवडणुकीत मनसेला सहकार्य केलं नसल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप...

राज ठाकरेंनी जरी उपमुख्यमंत्र्यांशी पार्किंगच्या विषयावर चर्चा केली असली तरी प्रत्यक्षात ही राज्याच्या राजकारण नवी स्पेस निर्माण करण्याची तयारी आहे का..? सध्या निवडणुका नसल्या तरी भविष्यात मनसेकडून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळी राजकीय समीकरणं मांडली जाणार का... हे पाहणं औत्सुक्याचं असेल हे नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com