Diliptatya Patil saam tv
महाराष्ट्र

Islampur Politics : 'सत्तेच्या व सुडाच्या प्रवासात पहिले निष्ठावंत संपवले जातात' दिलीपतात्यांचा काेणावर रोख ?

राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीची अनुषंगाने तात्यांनी चाचपणी सुरु केली की काय ?

विजय पाटील

Dilip Tatya Patil Social Media Post : सत्तेच्या व सुडाच्या प्रवासात पहिले निष्ठावंत संपवले जातात अशी पोस्ट सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी समाज माध्यमातून केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या वाळवा (walva) ग्रामपंचायतीत ऐतिहासिक सत्ता मिळवल्यानंतर दिलीपतात्या चर्चेत आले होते. आता राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक सुरु असताना त्यांनी केलेल्या या पोस्टचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील (Rajarambapu Patil) यांच्या अत्यंत जवळचे युवा नेतृत्व म्हणून दिलीप पाटील यांची कारकीर्द सुरु झाली होती. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटील सक्रिय वर्षे अध्यक्षपदावर कायम राहिले. त्यांच्याविरोधात अनेक वादळे आली, मात्र जयंत पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला.

राजकारणात आले, प्रवासात दिलीपतात्या सोबत होते. त्यांची बहुतांश कारकीर्द दिलीप पाटील इस्लामपूर परिसरातच झाली , मात्र २०१५ ला झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयानंतर त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाली.

जिल्ह्याच्या ठिकाणी यायला तब्बल ४० वर्षे लागली ', अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. एक वर्षासाठी अध्यक्ष झालेले दिलीपतात्या पुढे सहा त्या जिल्हा बँकेत सक्रिय असतानाच दिलीपतात्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले होते. सांगली लोकसभा मतदारसंघ आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेल्यानंतर दिलीपतात्यांचे नाव चर्चेत आले होते.

माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी त्यावर विचारही केला होता, मात्र त्यांचे नाव मागे पडले. जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाची कारकीर्द संपला, पुन्हा ते संचालक झाले. मात्र , जिल्हा आणि तालुक्याच्या राजकारणात त्यांचे स्थान थोडे अडगळीत पडल्याची त्यांच्या समर्थकांची भावना राहिली आहे. (Breaking Marathi News)

वाळवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या (election) निमित्ताने ते पुन्हा जोमाने सक्रिय झाले. नेमका कोण निष्ठावंत संपवला जातोय आणि संपवणार कोण आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. दिलीपतात्यांचा रोख 'घरच्या राजकारणावर ' आहे की अन्य पक्षातील घडामोडींत ते डोकावत आहेत.

याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीची त्याला किनार आहे का , याबाबतची लोक चर्चा करत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT