sangli, christian morcha
sangli, christian morchasaam tv

Sangli News : ख्रिस्ती बांधवांचा शुक्रवारी सांगलीत महामाेर्चा; विविध संघटनांचा पाठिंबा

या माेर्चात सुमारे वीस हजार ख्रिस्ती बांधव सहभागी हाेतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
Published on

Christian Community Morcha In Sangli : ख्रिस्ती समाजावर होणारे धर्मांतराचे आरोप थांबवावेत आणि असे आरोप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच आटपाडी प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांची शहानिशा करून गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 20) सांगलीत ख्रिस्ती बांधव माेर्चा काढणार आहेत. या भव्य मोर्चात समस्त ख्रिस्ती (christian) बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीने सांगली (sangli) येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. (Maharashtra News)

sangli, christian morcha
Sangli City Police : इंग्लिश बनावटीचे पिस्टलसह काेल्हापूर जिल्ह्यातील युवकास सांगलीत अटक

येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात ख्रिस्ती समाजावर होणारे आरोप थांबवावेत, ख्रिस्ती समाजाची बदनामी करणाऱ्यंवर कारवाई करावी, आटपाडी येथील संजय गेळे व कुटुंबीयांना संरक्षण द्यावे यासह अनेक मागण्या करण्यात येणार आहेत.

sangli, christian morcha
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : हिंदुत्ववाद्यांचा पंढरीतील डाव हाणून पाडणार : डाॅ. भारत पाटणकर

या मोर्चामध्ये सांगली, सातारा (satara), कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून ख्रिस्ती समाजाचे 15 ते 20 हजार ख्रिस्ती बांधव उपस्थित राहणार आहेत. या मोर्चामध्ये ख्रिस्ती समाजाच्या महिला, मुले मुली, धर्मगुरू सहभागी होणार आहेत.

sangli, christian morcha
Raj Thackeray Parli Court Updates : न्यायाधीशांचा राग अनावर; असं काय घडलं राज ठाकरेंच्या सुनावणीत

या मोर्चासाठी आरपीआच्या आठवले गट, बहुजन क्रांती मोर्चा, मातंग समाज, समस्त मुस्लिम समाज यांच्यासह विविध चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्चासाठी समस्त ख्रिस्ती समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. यावेळी आशिष कच्छी, राम कांबळे (मोर्चा संयोजक) यांनी माेर्चाबद्दल (morcha) सविस्तर माहिती दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com