Sangli City Police : इंग्लिश बनावटीचे पिस्टलसह काेल्हापूर जिल्ह्यातील युवकास सांगलीत अटक

पाेलिसांनी युवकाकडे चाैकशी केली असता त्याची उत्तर देताना भांबेरी उडाली हाेती.
Sangli, Police, Arrests, Youth
Sangli, Police, Arrests, YouthSaam Tv

Sangli Crime News : सांगली शहर पोलिसांनी (sangli city police) इंग्लिश बनावटीचे पिस्टलसह एकास अटक (arrest) केली आहे. त्याच्याकडून एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. या कारवाईची माहिती पाेलिस (police) निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.

Sangli, Police, Arrests, Youth
Nitin Deshmukh : राणे, रवी राणा, किरीट साेमय्या टपाेरी, देवेंद्रजी त्यांना आवरा; उद्धवजींवर बाेलाल तर... नितीन देशमुखांचा भाजपला इशारा

सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस गस्त करीत असताना एकजण हा इंग्लिश बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी सांगलीच्या (sangli) पांजरपोळ रोड (गणपती मंदिरा पाठीमागे) या ठिकाणी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थऴी वॉच ठेवला. (Maharashtra News)

Sangli, Police, Arrests, Youth
Maharashtra : सर्व बोर्ड, विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार; शिक्षकेतर कर्मचा-यांनी उपसले संपाचे हत्यार

पाेलिसांना एका दुचाकीवरुन एकजण संशयतरित्या फिरत असल्याची शंका आली. त्यास थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेले एक इंग्लिश बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्टल मिळून आले. पाेलिसांनी चाैकशी केली असता त्याच्याकडे त्याबाबत पिस्टल बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता.

Sangli, Police, Arrests, Youth
Nitin Deshmukh : राणे, रवी राणा, किरीट साेमय्या टपाेरी, देवेंद्रजी त्यांना आवरा; उद्धवजींवर बाेलाल तर... नितीन देशमुखांचा भाजपला इशारा

पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयित उत्तम दत्तात्रय पुजारी (वय 25 वर्ष रा.नरसिंहवाडी, तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर (kolhapur) याच्याकडून 40 हजार रुपयाचे इंग्लिश बनावटीचे पिस्टल आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com