Dhananjay Munde Discharged From Breach Candy Hospital : धनंजय मुंडेंना विश्रांतीची गरज, कुटुंबियांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आज दुपारच्या सुमारास मुंडेंना मिळाला डिस्चार्ज.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam Tv
Published On

Dhananjay Munde Latest Marathi News : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना साेळी दिवसांच्या उपचारानंतर आज (गुरवार) ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस धनंजय मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

Dhananjay Munde
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

तीन जानेवारीच्या मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे अपघात घडला होता. यावेळी त्यांच्या छातीला जखमा झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 16 दिवसांच्या उपचार करण्यात आले. (Dhananjay Munde Discharged From Breach Candy Hospital)

Dhananjay Munde
Sikander Shaikh News: सिकंदरवर अन्याय झाला सांगताना रशिद खानांचा अश्रूंचा फुटला बांध; ज्याने चूक केली त्याने...,

दरम्यान पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे. दरम्यान पुढील काही दिवस मुंडे यांना सहकारी मित्र, कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

Dhananjay Munde
Ajit Pawar News : अजित पवार विश्वासघातकी ! 'त्यांच्यावर काका शरद पवारांचाही विश्वास राहिला नाही'

दरम्यान या काळात उपचार केलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी यांची विचारपूस करून काळजी व्यक्त केलेल्या सर्वांचे धनंजय मुंडेंनी आभार मानले. तसेच मान्यवर आणि समर्थकांचेही आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com