Sikander Shaikh News: सिकंदरवर अन्याय झाला सांगताना रशिद खानांचा अश्रूंचा फुटला बांध; ज्याने चूक केली त्याने...,

पंचांचा निर्णय चुकला असल्याचा आरोप त्याचे वडील रशीद शेख यांनी केला.
Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikh
Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikhsaam tv
Published On

Maharashtra Kesari Controversy : महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेत मल्ल सिकंदर शेख (Wrestler Sikander Shaikh) आणि महेंद्र गायकवाड (Wrestler Mahendra Gaikwad) यांच्या लढतीच्या निकालावर गेले दाेन दिवसांपासून समाज माध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त हाेऊ लागल्या आहेत. या स्पर्धेत आमच्या सिकंदर याच्यावर अन्याय झाल्याचा आराेप आज त्याच्या पालकांनी देखील केला आहे.

Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikh
Khashaba Jadhav: लाल मातीतल्या पठ्ठ्याला Google चा सलाम! कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना डुडलची मानवंदना

पुण्यात (pune) शनिवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त विषय ठरला तो म्हणजे सिकंदर शेख. सिकंदर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. सिकंदरचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर 'हार कर जितनेवाले को सिकंदर कहते है' अशा आशयाचे छायाचित्र झळकू लागले आहेत.

Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikh
Sikandar Shaikh: जित से ज्यादा हार के चर्चे! मैदान हरला, पण कुस्तीचा 'सिकंदर' तोच ठरलायं; हारुनही हिरो ठरतोय सिकंदर शेख

महाराष्ट्र केसरीच्या किताबापासून वंचित राहिलेल्या सिकंदरच्या आई वडिलांनी या स्पर्धेतील नियाेजनाचे काैतुक केले आणि पंचांच्या निर्णयावर खंत व्यक्त केली. आमच्या मुलावर अन्याय झाला आहे. पंचांचा निर्णय चुकला असल्याचा आरोप त्याचे वडील रशीद शेख (Rashid Shaikh) यांनी केला.

Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikh
PT Usha : इतिहास रचला; भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी पीटी उषा

रशीद शेख म्हणाले मी त्याला हमाली करत शिकवलं. त्याने कुस्तीत यश मिळावे अशी आमची इच्छा हाेती. त्यामुळे त्याला काेल्हापूरला कुस्तीचे धडे घेण्यासाठी पाठविले. आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेकांनी त्याला पाठबळ दिले. (Maharashtra News)

Sikander Shaikh, Wrestler Sikander Shaikh, Rashid Shaikh
Mahableshwar: तीनशे फुट दरीत ट्रक काेसळल्याने अकरा चिमकुल्यांसह महिला भेदरल्या; अपघातग्रस्त निघाले हाेते मुख्यमंत्र्यांच्या गावी

रशीद शेख म्हणाले असा जर अन्याय हाेत असेल तर गरीबांना काेण वाली राहणार. त्याला जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आले. हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या मुलावर जो अन्याय झाला, तो इतर पैलवानांवर अन्याय होऊ नये असेही सिकंदरच्या वडिलांनी स्पष्ट केले. ज्यांना हा निर्णय दिला त्यांनी स्वत:च्या मुलाच्या डाेक्यावर हात ठेवत सांगावे माझा निर्णय याेग्य आहे अशी अपेक्षा रशिद खान यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com