Dhule ZP Saam tv
महाराष्ट्र

Dhule ZP CEO : जिल्हा परिषदेत सदस्यांनी शिंपडले गोमूत्र; सीईओंच्या बदलीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता यांच्या बदलीचे आदेश १९ मार्च रात्री उशिराने काढण्यात आले. त्याची (Jalgaon) जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली असून सीईओ गुप्ता यांच्या बदलीनंतर सदस्यांनी जिल्हा परिषद परिसरात गोमूत्र शिंपडले. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून (Dhule) धुळे जिल्हा परिषदेचे सिईओ शुभम गुप्ता यांच्यावर सत्ताधारी व विरोधकांतर्फे वारंवार विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप लावला गेला. सीईओतर्फे (Dhule ZP) मनमानी कारभार सुरू असल्याचा देखील आरोप वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांतर्फे लावण्यात येत होता. त्यानंतर १३ मार्चला (Zilha Parishad) जिल्हा परिषदेचे सिईओं यांच्या विरोधात अविश्वास ठरावा करण्यात आला. या नंतर बदली झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांच्यावर जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी मागील आठवड्यात अविश्वास ठराव आणल्यानंतर शुभम गुप्ता यांची (Jalgaon ZP) जळगाव येथे बदली करण्यात आली आहे, शुभम गुप्ता यांची बदली झाल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जिल्हा परिषद सदस्यांनी गोमूत्र शिंपडून त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT