Dhule News : विकासकामे होत नसल्याने ग्रामस्त संतप्त; मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Political News : गोरगरीब वस्ती व झोपडपट्टीमधील रहिवासी नागरिकांनी वेळोवेळी सातबारा उतारा सिटी सर्वे उतारा व पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर निवेदने दिले आहे.
Dhule News
Dhule NewsSaam TV
Published On

Dhule News :

शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत बॅनर झळकवून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. धुळे शहरातील मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा, इतर गोरगरीब वस्ती व झोपडपट्टीमधील रहिवासी नागरिकांनी वेळोवेळी सातबारा उतारा सिटी सर्वे उतारा व पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर निवेदने दिले आहे.

Dhule News
Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

निवेदने देऊन देखील न्याय मिळत नसल्याने, शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून कोणीही मतदान न करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. निवडणुकीच्या वेळेस घरावर काळे झेंडे लावत मतदान न करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

शासनाच्या योजनांचा लाभच मिळणार नसेल आणि मतदान करून लोकप्रतिनिधींना आपले अमूल्य मत देऊन कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसल्यामुळे नागरिकांनी हा निर्णय घेतलाय. काहीच सुखसुविध नसल्याने येथील ग्रामस्तांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली आहे.

धुळे शहरातील शेतकरी पुतळापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा भराव करण्यासाठी मुरूम ऐवजी कचरा डेपोतील कचऱ्याच्या गाड्या खाली करून त्याचा भराव केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लावण्यात आला होता. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची देखील मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करत कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे.

Dhule News
Maharshtra Politics: लोकसभा उमेदवारीवरुन दानवे-खैरेंमध्ये जुंपली; अंबादास दानवेंच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com