Dhule News Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: शिवसेनेने काढली पालिका प्रशासनाची अंत्‍ययात्रा; पाणीटंचाई संदर्भात आक्रमक

शिवसेनेने काढली पालिका प्रशासनाची अंत्‍ययात्रा; पाणीटंचाई संदर्भात आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : धुळेकरांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आठ ते दहा दिवसानंतर पिण्याचा पाण्याचा पुरवठा पालिका प्रशासनातर्फे (Dhule News) करण्यात येत आहे. या विरोधात उद्धव ठाकरे शिवसैनिक (Shiv Sena) चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे, (Latest Marathi News)

धुळेकरांना होत असलेल्या पाणीटंचाई संदर्भात पालिका प्रशासनाला वेळोवेळी आंदोलन व निवेदन देऊन देखील पालिका प्रशासनतर्फे यासंदर्भात कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला आहे. यापुढे जर अशाच प्रकारे पालिका (Dhule Corporation) प्रशासनातर्फे या आंदोलनाची देखील दखल घेत धुळेकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यात न आल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनिकांतर्फे पालिका प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. धुळे शहरातील महत्त्वाच्या चौकांमधून ही अंत्ययात्रा पुढे सरकत धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारावर आणण्यात आली. यावेळी धुळे महानगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी देखील अंत्ययात्रेदरम्यान काढण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

SCROLL FOR NEXT