Amravati News : 'लाॅ' पेपर फुटी प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

आज सर्वांना विद्यापीठाच्या समिती समाेर हजर केले जाणार आहे.
amravati crime news, sant gadge baba amravati university
amravati crime news, sant gadge baba amravati universitySaam Tv

- अमर घटारे

Amravati News : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विधी अभ्यासक्रमाच्या पेपर फुटी प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी (ptanit soni) यांच्यासह दोघांचा समावेश आहे. (Maharashtra News)

amravati crime news, sant gadge baba amravati university
Wardha News : वर्धेतील बॅंकेच्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर सायबर चाेरट्यांचा डल्ला

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (sant gadge baba amravati university) अंतर्गत घेण्यात आलेल्या 2023 च्या परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या लॉ ऑफ ट्रस्ट या विषयाचा पेपर अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत सुरू असताना (22 मे) हा पेपर समाज माध्यमातून फुटला.

amravati crime news, sant gadge baba amravati university
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गाडगे नगर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी (ptanit soni) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समिती समाेर हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढच्या टप्प्यात कुठले वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com