Beed News: रेशन माफियांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे अभय? मनसे तालुकाध्यक्षांचा गंभीर आरोप...

MNS News: कारवाई न झाल्यास कोर्टात याचिका दाखल करणार आणि वेळ पडल्यास कार्यालयासही कुलूप ठोकणार - श्रीकृष्ण गायके
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Beed News Today: बीड जिल्ह्यातील रेशन माफीया आणि रेशन गायब करणाऱ्या रेशन दुकानदारांना, बीड जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अभय आहे? या रेशन गायब करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख हे त्यांच्यावर मेहरबान आहेत. केवळ थातूरमातूर कारवाई केल्याचं दाखवतात. असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके यांनी केलाय. (Latest Marathi News)

Beed News
Uttar Pradesh News: एकत्र शाळा, एकाच दिवशी लग्न अन् एकत्रच जग सोडलं, मित्राच्या जळत्या चितेवर उडी घेत संपवलं जीवन

बीडच्या (Beed) सौंदना गावातील रेशन घोटाळ्याबाबत श्रीकृष्ण गायके यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पुराव्यासह तक्रार केली होती. यामध्ये गायके यांनी डिसेंबर 2022 चे रेशन गावातील स्वस्त धान्य दुकानदार असणाऱ्या हाकाळे यांनी कसे गायब केलं ? याचे देखील पुरावे दाखल केले आहेत.

मात्र गेल्या चार महिन्यापासून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडून कारवाईसाठी चालढकल केली जात आहे. नोटीस काढली आहे असे कारण दिले जात आहेत आणि आता ज्या स्वस्त धान्य दुकानदारानी गावातील तब्बल 168 रेशन धारकांचे धान्य हे काळ्या बाजारात विकले. मात्र त्याला केवळ 5 हजार रुपये दंड या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ठोठावलाय. (Beed News)

ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी लाखोंचे धान्य विकले. त्याला केवळ 5 हजार रुपये दंड जिल्हा पुरवठा अधिकारी ठोठावतात. बीड जिल्ह्यातील हे एकच दुकानदार नाही की जे रेशन गायब करतं, जिल्ह्यात असे अनेक रेशन दुकानदार रेशनचा घोटाळा करतात. मात्र या सर्वांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अभय आहे? आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यात हा रेशन घोटाळा होतोय. असा गंभीर आरोप देखील यावेळी मनसे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके यांनी केलाय

Beed News
Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणाचा राडा, कारवर चढून फोडल्या काचा; VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान सौंदना गावातील रेशन धारकाचा परवाना रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या रेशन माफियांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी गायके यांनी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आणि वेळ पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयात देखील कुलूप ठोकू असा इशारा देखील यावेळी श्रीकृष्ण गायके यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com